
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मलबार हिल आणि मुंबादेवी विधानसभेच्या वतीने मोफत मधुमेह तपासणी मशीन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्रभागातील जवळपास 200 नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पवार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, राजकुमार बाफना, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर, माई परब, भैरूलाल चौधरी, सुरेखा उबाळे, निलेश अहिरेकर, राजेंद्र गायकवाड, प्रभाकर पाष्टे, राजेश हजारे, रिया चेंदवणकर, युवासेनेचे किसन सावंत, प्रथमेश सकपाळ, शिवाजी रहाणे, गजानन भोसले, दिलीप सावंत, रोहित महाडिक, हर्षवर्धन हांडे, विजय देवकर, सुशांत आगोंडे, परेश खारवा, विनायक गुरव आदी उपस्थित होते.



























































