बिल मंजुरीसाठी ठेकेदाराकडून ऐंशी हजार मागितले , मालेगाव महापालिकेच्या आयुक्तांसह तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालेगाव महापालिकेमार्फत केलेल्या विकासकामांच्या दोन बिलांना मंजुरी देण्यासाठी 80 हजारांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आयुक्त रवींद्र शेषराव जाधव, त्यांचे स्वीय्य सहाय्यक नीलेश पाटील, अकाऊंटंट हरीश डिंबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली आहे.

मालेगावमध्ये दोन ठेकेदारांनी दोन विकासकामे केली, हे बिल मंजुरीसाठी त्यांनी महापालिका आयुक्तांच्या स्वीय्य सहाय्यकांशी संपर्क साधला. आयुक्तांची परवानगी घेऊन स्वीय्य सहाय्यकांनी या ठेकेदारांकडून बिल रकमेच्या चार टक्के म्हणजे 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणाला अकाऊंटंटनीही प्रोत्साहन दिले. ठेकेदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी करून पथकाने महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह वरील तिघांना अटक केली. उपअधीक्षक स्वाती पवार, निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.