सोने दोन दिवसांत 2300 रुपयांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन सणासुदीत सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होत आहे. दसऱयाच्या दुसऱया दिवशी सोने पुन्हा एकदा स्वस्त झाले असून अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 2 हजार 300 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीमुळे 24 पॅरेट सोने प्रति तोळा 1 लाख 44 हजारांपर्यंत खाली आले आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतसुद्धा घसरण सुरू आहे. बुधवारी चांदी 2 हजार 900 रुपयांनी घसरून प्रति किलो 2 लाख 6 हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.