व्हॉट्सअॅपमध्ये आले मेसेज शेडय़ुल फीचर; फोन स्विच ऑफ असला तरी मेसेज करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरचे नाव मेसेज शेडय़ुल फीचर असे असून या फीचरची बऱयाच महिन्यांपासून प्रतीक्षा होती. या फीचरच्या मदतीने युजर्स कोणताही मेसेज आधीच लिहून तो 10 ते 14 मिनिटांपर्यंत शेडय़ुल करू शकतील. म्हणजेच एखाद्या मित्राला बरोबर 12 वाजता मेसेज पाठवायचा असेल आणि 14 मिनिटांपर्यंत त्याच्या फोनमध्ये बॅटरी नसेल तर तो आधीच मेसेज शेडय़ुल करून ठेवू शकेल व तो मेसेज बरोबर त्याच वेळेला मित्राला डिलिव्हर होईल.

ही सुविधा खासगी चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हींमध्ये काम करणार आहे. हे फीचर येत्या काही आठवडय़ांत रोलआऊट केले जाईल. हे फीचर फक्त टेक्स्ट मेसेजपुरते मर्यादित नसून यात पह्टो-व्हिडीओही शेडय़ुल करता येतील. मेसेज डिलिव्हर झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला तो नेहमीच्या व्हॉट्सअॅप मेसेजप्रमाणेच दिसेल. फोन स्विच ऑफ असला तरीही शेडय़ुल केलेला मेसेज ठरलेल्या वेळी डिलिव्हर होईल.

शेड्युल केलेले मेसेजदेखील व्हॉट्सअॅपच्या इतर वैयक्तिक मेसेजप्रमाणे एंड–टू–एंड एन्क्रिप्टेड राहतील. नव्या शेडय़ुल फीचरमुळे रिमाइंडर पाठवणे आणि खासप्रसंगी वेळेवर शुभेच्छा देण्याची सवय आणखी सोपी होऊ शकते. एखाद्या ग्रुपसाठी रिमाइंडर मेसेज शेडय़ुल केला असेल आणि नंतर युजर्सचा प्लॅन बदलला, तर ठरलेल्या वेळेपूर्वी तो मेसेज हटवता येऊ शकतो.