
नेपाळ सरकारने त्रिशुली-भोटेकोशी नदीत ऑगस्टमध्ये अचानक आलेल्या पुरात बेपत्ता झालेले 213 हिंदुस्थानी नागरिकांना मृत घोषित करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी नेपाळ येथील भारतीय दूतावासाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून ज्या कुटुंबीयांना आक्षेप घ्यायचा असेल त्यांनी 2 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे.
एनडीआरआरएमएने आपल्या वेबसाइटवर 213 बेपत्ता हिंदुस्थानी नागरिकांची एक यादी जाहीर केली आहे. ही यादी मृत्युमुखी होण्याच्या आधारावर जाहीर करण्यात आली आहे. एनडीआरआरएमएने या यादीत नाव जोडणे, नाव हटवणे किंवा काही बदल असल्यास आपले म्हणणे मांडावे, असे सांगण्यात आले आहे. जर कोणाला या यादीत काही बदल हवा असल्यास भारतीय दूतावासांशी संपर्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
1453 लोकांचा मृत्यू, 5 हजार बेपत्ता
26 ऑगस्टला आलेल्या अचानक पुरामुळे कमीत कमी 1 हजार 453 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 5 हजारांहून अधिक लोक बेपत्ता आहेत. या पुरात शेकडो घरे, वाहने, रस्ते, पूल वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.



























































