आइसक्रीम की फ्रोजन डेजर्ट या उन्हाळ्यात नक्की काय खाताय? जाणुन घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा सुरू होताच आपल्याला थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणुन उन्हळ्यात ज्यूस, आणि आइसक्रीमची मागणी वाढते. अनेकदा आपण आवडीने पॅकेज केलेले आइसक्रीम घरी मागवून खातो. पण तुम्हाला माहित आहे का, बहुतेक वेळा आपण आइसक्रीम एवजी फ्रोझन डेझर्ट्सच खात अहोत. खरे तर, आइसक्रीम आणि फ्रोझन डेझर्ट्समधील फरक फार कमी लोकांना समजतो. दुकानदार अनेकदा गिऱ्हाईकांना माहिती न देताच विक्री करतात.

आजकाल आइसक्रीमपेक्षा फ्रोझन डेझर्टची विक्री जास्त होत आहे. जरी ते बनवण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी वापरले जाणारे घटक पूर्णपणे वेगळे असले तरी त्यातील कॅलरीचे प्रमाणही वेगवेगळे असते. ज्याचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होतो. या उन्हाळ्यात आइसक्रीम आणि फ्रोझन डेझर्ट्समधील फरक जाणून घ्या.

आइसक्रीम या घटकांपासून बनवले जाते
आइसक्रीम दूध, क्रीम आणि दुधाची मलाई वापरून बनवले जाते. गरजेनुसार त्यात साखर, सुकामेवा, फळे आणि इतर स्वाद पदार्थ घातले जातात. योग्य प्रकारे तयार केलेले आइसक्रीम खूप फायदेशीर असते.

फ्रोजन डेजर्टमध्ये हे घटक असतात
फ्रोजन डेजर्टमध्ये सामान्यतः तेल (वनस्पती तेल, पाम तेल) वापरून बनवलेला गोड पदार्थ असतो ज्यामध्ये अतिरिक्त साखर, दुधाची पावडर आणि काही कृत्रिम स्वाद मिसळलेले असतात. यापदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते आणि त्यात ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असू शकते.

आइसक्रीम आणि फ्रोझन डेझर्ट्समधील फरक कसा ओळखावा?
आइसक्रीमचे पॅकेट विकत घेताना त्यावर लिहिलेल्या घटकांकडे लक्ष द्या. जर पॅकेटवर “वनस्पती तेल” किंवा “वनस्पती प्रथिने” असे लिहिले असेल, तर याचा अर्थ ते आइसक्रीम नसून एक फ्रोजन स्वीट पदार्थ आहे.

फ्रोझन डेझर्ट्स खाण्याचे तोटे काय आहेत?
फ्रोझन डेझर्ट्स आणि आईस्क्रीम यांमधील मुख्य फरक म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आणि वनस्पती तेलाचा वापर. यामध्ये शरीरासाठी आईस्क्रीम थोडे अधिक आरोग्यदायी मानले जाते. तथापि, दोन्हीमध्ये साखर असते आणि त्यांच्या थंडपणामुळे ते पचनासाठी अयोग्य मानले जातात. याव्यतिरिक्त, बाजारात उपलब्ध असलेले आइसक्रीम आणि फ्रोझन डेझर्ट्स या दोन्हींमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात जे तुमच्या संपूर्ण आरोग्याला हानी पोहोचवतात. फ्रोझन डेझर्ट्समधील ट्रान्स फॅटमुळे शरीरात लठ्ठपणा आणि हृदयविकाराच्या समस्या उद्भवू शकतात.

  • उन्हाळ्यात आइसक्रीमचा आनंद घ्यायचा असेल तर ते एखाद्या नामांकित ब्रँडकडून खरेदी करा आणि लेबलवरील सूचना काळजीपूर्वक वाचा. नैसर्गिक घटक वापरून घरीच आइसक्रीम बनवणे सर्वोत्तम आहे. यामुळे साखरेचे प्रमाण कमी राहते आणि ते प्रिझर्व्हेटिव्हशिवाय तयार केले जाते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी कमी हानिकारक ठरते.