
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेवटच्या चेंडूवर सामना रंगला. आधी गुजरातने दिल्लीचा एका धावेने पराभव केला, नंतर लखनौने कोलकातावर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. लखनौकडून सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या 21 वर्षीय मुकुल चौधरी याने मॅचविनिंग खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 7 उत्तुंग षटकार ठोकले आणि सामना एकहाती फिरवला. मुकुलच्या या वादळी खेळीनंतर अर्जुन तेंडुलकर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो मुकुलच्या तुफानी फलंदाजीबाबत बोलत आहे.
कोलकाताविरुद्ध मुकुल चौधरी याने अवघ्या 27 चेंडूत 2 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे एकवेळ अशक्य वाटणारे आव्हान लखनौने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. यानंतर शुभंकर मिश्रा याच्या पॉडकास्ट शोमध्ये अर्जुन तेंडुलकर याने मुकुलबाबत केलेले विधान व्हायरल झाले आहे. नेट्स प्रॅक्टिस दरम्यान गोलंदाजी करताना लखनौच्या संघातील कोणत्या खेळाडूत तुला धमक दिसली? आणि आगामी दोन वर्षात लखनौकडून कोणता खेळाडू आयपीएल गाजवेल असे विचारले असता अर्जुनने मुकुल चौधरी याचे नाव घेतले.
मुकुल चौधरी याने ठोकलेले षटकार पाहून मी प्रभावित झालो. मैदानातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तो लिलया षटकार ठोकणारा फलंदाज आहे. सरावा दरम्यान त्याने स्क्वेअर लेग, पॉइंटच्या वरतून आणि अपर कटसह षटकार मारल्याचा उल्लेख अर्जुन तेंडुलकर याने केले. तसेच यंदाच्या हंगामात मुकुल चौधरी याची कामगिरी लक्षवेधी ठरेल, असेही अर्जुन म्हणाला.
Arjun Tendulkar’s game knowledge, he said Mukul Choudhary is the player to watch out for this season from LSG❤️🔥 pic.twitter.com/LA3ZHwkAtK
— Rajiv (@Rajiv1841) April 9, 2026
दरम्यान, मुकुल चौधरी यानेही शुभंकर मिश्रा यांच्यासोबत गप्पा मारताना आपल्याला फिनिशर महेंद्रसिंह धोनीसारखो व्हायचे असल्याचे म्हटले होते. धोनी हा सामन्याची परिस्थिती पाहतो आणि तशी खेळी करून सामना संपवतो. याच गोष्टीचे अनुकरण मी करतो, असे मुकुल म्हणाला होता.
Arjun Tendulkar’s game knowledge, he said Mukul Choudhary is the player to watch out for this season from LSG❤️🔥 pic.twitter.com/LA3ZHwkAtK
— Rajiv (@Rajiv1841) April 9, 2026




























































