
79 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्तरांवरील पोलीस, जवान, शाळा–महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सराव केला जात आहे. 15 ऑगस्ट केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तर देशासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवणदेखील आहे. नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. बुधवारी लष्कर, नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी कसून सराव केला. दिल्लीसह संपूर्ण देशभरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.