ट्रेंड ब्लॉगर -माकड

सध्या ब्लॉगचा जमाना आहे. यूटयूब आणि इन्स्टाग्रामसाठी लाखो लोक रोजच्या रोज ब्लॉग तयार करतात. यातील अनेक ब्लॉगर जगभर प्रसिद्ध आहेत. पण या सर्वांना मागे टाकत एका माकडाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे माकड जगभर भ्रमंती करून व्हिडिओ काढते आणि ब्लॉग बनवते. वेगवेगळ्या भाषेत संवाद साधते आणि लोकांना हटके माहिती देते. ऐकायला थोडे विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. बबलू असे या माकडाचे नाव आहे. अर्थात, माकड ब्लॉगिंग करते हे खरे असले तरी ते खरेखुरे माकड नसून एआय जनरेटेड आहे. या माकडाचे व्हिडिओ लोक उत्सुकतेने ऐकतात आणि शेअरही करतात. इन्स्टावर जाऊन तुम्हीही या बबलूच्या ब्लॉगचा आनंद घेऊ शकता!