
मुस्लिम मते देणार नाहीत, त्यामुळे मुस्लिम नको, हिंदूंचे पॅनल तयार करा, अशा सूचना भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि डी.पी. सावंत यांनी कार्यकर्त्याला दिल्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर अशोक चव्हाण, डी.पी. सावंत व अन्य एका कार्यकर्त्याच्या संभाषणाची ही क्लिप आहे. गेली 40 वर्षे मुस्लिम समाजाच्या जिवावर राजकारण करून सत्ता भोगणारे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांचा दुटप्पी चेहरा समोर आल्याची टीका नांदेडच्या राजकीय वर्तुळातून चव्हाण यांच्यावर होत आहे.


























































