
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यावर आता नवीन जबाबदारी सोपावण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अश्विनी भिडे यांना तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पुढे आदेश येईपर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभारदेखील सांभाळण्याचे निर्देश भिडे यांना दिले आहेत.