
150 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेचा हाँगकाँगने चांगलाच घामटा काढला. 6 बाद 127 अशी अवस्था केल्यामुळे लंका अडचणीत आली होती, पण शेवटच्या क्षणी वानिंदु हसरंगाने 9 चेंडूंत 20 धावा करत लंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे लंकेने 7 चेंडू आणि 4 विकेट राखत विजयी लक्ष्य गाठले. सलग तीन पराभवांमुळे हाँगकाँग स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे.
हाँगकाँगच्या डावाला झिशान अली (23), अंशी रथ (48) आणि निझाकत खानच्या (ना. 52) उपयुक्त फलंदाजीने 149 पर्यंत नेले, तर लंकेच्या डावात पथुम निसांका (68) हा एकटाच खेळला. त्याच्या फटकेबाजीमुळे 2 बाद 119 अशा सुस्थीत असलेल्या श्रीलंकेची 6 बाद 127 अशी घसरगुंडी उडाली. 8 धावांत 4 फलंदाज बाद झाल्यामुळे लंका अडचणीत आली होती, तर हाँगकाँगच्या खेळाडूंमध्ये उत्साह संचारला होता. तेव्हा वानिंदु हसरंगा संघाच्या मदतीला धावला. त्याने संघाला 17 चेंडूंत 23 धावांची गरज असताना 9 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 20 धावा ठोकल्या आणि श्रीलंकेने विजय नोंदवत सुपर पह्रच्या दिशेने आपली पावले टाकली.
सलग दोन विजयांमुळे श्रीलंका गटात अव्वल स्थानी असून अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 16 सप्टेंबरला होणाऱ्या लढतीत सुपर पह्रचे चित्र स्पष्ट होऊ शकते. आता सुपर पह्रमध्ये स्थान मिळवण्यासाठी अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या चारही संघांना विजयाची नितांत गरज असेल. एक पराभव या संघांचे स्पर्धेतील स्थान संपुष्टात आणू शकतो.
सलग दोन विजयांमुळे श्रीलंका गटात अव्वल स्थानी असून अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 16 सप्टेंबरला होणार्या लढतीत सुपर पह्रचे चित्र स्पष्ट होऊ शकते. आता सुपर पह्रमध्ये स्थान मिळवण्यासाठी अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या चारही संघांना विजयाची नितांत गरज असेल. एक पराभव या संघांचे स्पर्धेतील स्थान संपुष्टात आणू शकतो.