
पाकिस्तानात सैन्याचा उठाव होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना पदावरून हटवण्याच्या आणि बंडखोरी होण्याच्या शक्यतेने देशातील राजकीय वातावरण अस्थिर झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर नवे अध्यक्ष होण्याचे संकेत आहेत. बिलावल भुट्टो झरदारी यांनी मुनीर यांच्यावर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी बोलताना उघडपणे टीका केल्यामुळे पाकिस्तानात तणाव वाढला आहे. हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यास कोणताही आक्षेप नसावा, असे भुट्टो यांनी म्हटले होते.