AIU ने अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व केले रद्द, वेबसाइटवरून नाव आणि लोगो काढून टाकण्याचे आदेश

हिंदुस्थानी विद्यापीठ संघटनेने (AIU) अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. एआययूचे सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे विद्यापीठाची स्थिती चांगली दिसत नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.आतापासून अल-फलाह विद्यापीठ त्यांच्या वेबसाइटवर एआययूचा लोगो वापरू शकत नाही.

अल-फलाह विद्यापीठाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून एआययूचे नाव आणि लोगो तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एआययूचे सदस्यत्व निलंबित करण्याबाबतची सूचना सर्व सदस्य विद्यापीठांच्या कुलगुरू आणि संचालकांनाही पाठवण्यात आली आहे.

आता ईडीच्या रडारवर अल फलाह विद्यापीठ, आर्थिक व्यवहारांची होणार तपासणी