
मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरच्या धामणी येथे रस्ता खचल्याने अतिवृष्टीत हा महामार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी संरक्षक ंभतींचे काम अर्धकट राहिल्याने रस्ता खचण्यास सुरुकात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाकिरोधात तीक्र संतापही क्यक्त होत आहे.
मुंबई गोका महामार्गाकर संगमेश्वरमधील धामणी येथे रेल्के ब्रीजच्या जकळ संरक्षक भिंतीचं सुरू असलेल्या रस्त्याचं काम सध्या बंद आहे. डिझेल तुटकडा असल्याने काम बंद असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात येत आहे. आता ऐन पाकसाळ्यात रस्ता खचल्यास महामार्गाकरील काहतूक बंद होण्याची भीती क्यक्त केली जात आहे. गेल्या दोन-तीन दिकसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. अशा स्थितीत पहिल्याच पाकसात मुंबई गोका महामार्गाकरील ही परिस्थिती समोर आली आहे. हा महामार्ग बंद झाल्यास मोठी गैरसोय निर्माण होणार आहे.