
रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१० मध्ये आज (20 डिसेंबर 2025) सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. आज दिवसभर शांततेत मतदान पार पडले असून प्रभाग क्र.१० मध्ये 49 टक्के मतदान झाले.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीसाठी दि. २ डिसेबर रोजी मतदान झाले होते. मात्र रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.१० मधील नगरसेवक पदासाठीच्या मतदानाला स्थगिती मिळाली होती. प्रभाग क्र.१० चे मतदान आज दि.२० डिसेंबर झाले. सकाळी पहिल्या टप्प्यात ८.२० टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात १९.२० टक्के मतदान झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत २९.८५ टक्के मतदान झाले होते. महाविकास आघाडीकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगांवकर निवडणूक लढवत आहे.































































