
हिंदुस्थान–पाकिस्तान सीमेवर दर दिवशी बिटिंग रिट्रीट समारंभाचे आयोजन करण्यात येते. पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर हा समारंभ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला. काही दिवसांच्या विरामानंतर हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र त्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. बीएसएफच्या माहितीनुसार, बिटिंग रिट्रीट कार्यक्रम आता सायंकाळी 6 वाजल्यापासून 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत अर्ध्या तासाच्या कालावधीत पार पडेल. यापूर्वी हा संपूर्ण कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होऊन सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू रहायचा.