
शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 8 हजार 600 रुपयांची घसरण झाली आहे. गुरुवाती 916 शुद्धतेचे 22 कॅरेट सोन्याची किंमत तोळ्याला 1 लाख 42 हजार 575 रुपये होती. ती शुक्रवारी कमी होऊन 1 लाख 33 हजार 920 रुपये झाली आहे. चांदीच्या दरातही 17 हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदी आता प्रति किलो 2 लाख 41 हजार 945 रुपये झाली आहे. 24 कॅरेट सोने शुक्रवारी 1 लाख 52 हजार 751 रुपयांवर पोहोचले आहे.




























































