कृत्रिम शस्त्रक्रिया करून आपला संपूर्ण चेहराव बदलता येतो. आजपर्यंत अशा शस्त्रक्रिया अनेक कलाकारांनी केलेल्या आपल्या पाहिल्या आहेत. मात्र या शस्त्रक्रियांचा कधी कधी वाईट परिणाम झालेलाही दिसून येतो. अशीच एक घटना एका अभिनेत्रीसोबत घडली आहे. सलमान खानसोबत बॉलीवूड चित्रपटातून झळकणारी अभिनेत्री आयेशा टाकिया तिच्या नव्या लूकमुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या या नव्या लूकला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. मात्र आता या ट्रोलिंगला कंटाळून आयशाने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहे.
आयेशा टाकिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे नवीन लूक मधील फोटो, व्हिडीओ ती नेहमी शेअर करत असते. असाच एक नव्या लूकमधील फोटो आयेशाने शेअर केला आहे . मध्ये ती ब्लू आणि गोल्डन कलरच्या साडीत दिसत आहे. यासोबत तिने पिंक टोन्ड मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. या फोटोमध्ये चाहत्यांना ती आयशा आहे हे ओळखता येत नाही. मात्र या फोटोमध्ये ती वेगळीच दिसत आहे. आयेशाने देखील कृत्रिम शस्त्रक्रिया करून आपला लूक बदलाल असल्याची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.
आयोशाच्या फोटोमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय. एका यूजरने लिहिले – तुम्ही तुमचा चेहरा आणि नैसर्गिक सौंदर्य का खराब करत आहात? तर एकाने एकाने लिहिले- तिला वाटते की ती काइली जेनर आहे, असे म्हंटले आहे. या सगळ्या ट्रोलींगा कंटाळून अभिनेत्रीने तिचे सोशल मीडियाचे इन्स्टाग्राम अकाऊंटच बंद केले आहे, अशी चर्चा सध्या नेटकऱ्यामध्ये सुरू आहे.
आयशाने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात ‘टारझन’, ‘दिल मांगे मोर’, ‘सोच ना था’, ‘शादी नंबर 1’, ‘दोर’ आणि ‘पाठशाला’, ‘वॉन्टेड’ यांचा समावेश आहे. ‘वॉन्टेड’ चित्रपटाच्या यशानंतर आयेशा टाकियाने लग्न केले. 2011 मध्ये आलेल्या ‘मोड’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.