Photo – अयोध्येचा दीपोत्सव गिनीज बुकात

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्या नगरी रविवारी भक्ती आणि श्रद्धेच्या तेजाने झळाळून उठली. निमित्त होते शरयू नदीच्या काठी आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचे. यानिमित्ताने अयोध्या नगरीचे नाव ‘गिनीज बुका’त गेले. एकाच वेळी 26 लाख 17 हजार 215 दिव्यांचे प्रज्वलन आणि सर्वाधिक दिव्यांचे प्रज्वलन असे दोन विक्रम नोंदवले गेले.