
बाबा सिद्दीकी यांच्या खुन्यांनी युट्युबवरचे व्हिडीओ पाहून बंदुक चालवायला शिकले होते. तसेच या आरोपींनी कुर्ल्यात राहून सरावही केला होता. पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपी शुटर शिवकुमार गौतमने उत्तर प्रदेशात लग्नात वापरल्या जाणाऱ्या बंदुकीने सराव केला होता. गौतम हा मुख्य आरोपी आहे. त्याला बंदूक चालवायला येत होती. तब्बल एक आठवडा सर्व आरोपी युट्युबवर व्हिडीओ पाहून बंदूक शिकत होते. इतकंच नाही तर कुर्ल्यात या आरोपींनी बंदुक चालवयचा सरावही केला होता.
शुभम लोणकर या लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात होता. सर्व आरोपी इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. एखादा मेसेज पाठवल्यानंतर ठराविक वेळेनंतर ते मेसेज आपोआप डिलीट होतात असे स्नॅपचॅटमध्ये फीचर आहे. म्हणून आरोपी संपर्कासाठी स्नॅपचॅट वापरत होते.