
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा ‘हेराफेरी’च्या तिसऱ्या भागाची सध्या चर्चा सुरू आहे. ‘हेराफेरी-3’ मध्ये बाबूभैया ऊर्फ परेश रावल दिसणार नाहीत, अशी चर्चा झाली. परंतु अखेर बाबूभैया या चित्रपटात काम करणार असल्याचे समोर आले आहे. परेश रावल यांनी स्वतः हिमांशू मेहता यांच्या पॉडकास्टमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अक्षय आणि सुनील हे माझे वर्षानुवर्षे मित्र आहेत, असेही परेश रावल यांनी म्हटले आहे.