बजाजचा इलेक्ट्रिक गोगो ऑटो लाँच

बजाज ऑटोने तीनचाकी सेगमेंटमध्ये बजाज गोगो नावाचा इलेक्ट्रिक ऑटो लाँच केला. हा ऑटो तीन व्हेरियंट पी-5009, पी-5012 आणि पी-7012मध्ये लाँच केला आहे. बजाज गोगो फूल चार्जींगमध्ये 251 किमीपर्यंतची रेंज देण्यात सक्षम आहे. पी-5009 आणि पी-7012 या ऑटोची किंमत अनुक्रमे 3 लाख 26 हजार 797 रुपये आणि 3 लाख 83 हजार 004 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या ऑटोची देशातील सर्व बजाज ऑटो डीलरशीमध्ये बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या वेळी बजाज ऑटो लिमिटेडच्या इन्ट्रा सिटी बिझनेस युनिटचे अध्यक्ष समरदीप सुबंध उपस्थित होते.