शाहीर यशवंत जाधव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख, शिवसेना आणि मराठी माणसाच्या लढ्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा पोवाडा सादर केला. ‘मुंबई महाराष्ट्रावर पुन्हा येईल हो शिवसेनेचे ‘राज’, शाहीर भाकीत करतो आज’, असा दुर्दम्य विश्वास व्यक्त करताना डफावर शाहीराची थाप कडाडल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले.




























































