
युद्धाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या खुल्या विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून पेट्रोल, डिझेलचा बेकायदेशीर साठा केल्यास थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपचालक व मालकांना पेट्रोल, डिझेल खुली विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यानुसार पेट्रोल व डिझेलची विक्री केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच करावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत कॅन, बाटली किंवा इतर अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन भरण्यास व विक्रीस सक्त मनाई करण्यात आली आहे. सर्व पेट्रोलपंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे व विक्रीची नोंद नियमितपणे राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अनधिकृतपणे पेट्रोल-डिझेल साठवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.


























































