
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी सकाळी बारामती येथे अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह दोन पायलट, फ्लाईट अटेंडंट आणि पीएसओ यांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले कॅप्टन सुमित कपूर यांचाही समावेश आहे. या अपघाताचा सध्या तपास सुरू आहे. तपासात सुमित कपूर यांच्या व्यावसायिक कारकिर्दीशी संबंधित गंभीर आणि वादग्रस्त माहिती उघड झाली आहे.
कॅप्टन सुमितवर ड्युटीवर असताना मद्यप्राशन केल्याचे दोन गुन्हे दाखल झाले होते. पहिला गुन्हा 2010 मध्ये घडली होती. वैद्यकीय तपासणी दरम्यान सुमित यांची अल्कोहोल चाचणी पॉझिटिव्ह आढळली. यानंतर संबंधित एअरलाइनने त्यांना सेवेतून काढून टाकले होते.
यानंतर, 2017 मध्ये, पुन्हा एकदा ड्युटीवर असताना मद्यप्राशन करताना सुमित पकडले गेले. दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने हे विमान सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर मानून, नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले. त्यानंतर त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले.
बडतर्फीनंतर, कॅप्टन सुमित कपूर यांनी काही काळ फ्रीलान्स पायलट म्हणून काम केले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ते व्हीएसआर व्हेंचर्सशी संबंधित होते. बारामती येथील विमान अपघातात त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांची वादग्रस्त पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामुळे विमान वाहतूक सुरक्षा आणि वैमानिकांच्या फिटनेसच्या नियमांवरही गंभीर प्रश्न उपस्थित होतात.































































