
- दिवाळी सणात फटाके फोडल्याशिवाय सण साजरा केला असं वाटत नाही. त्यामुळे घरातील छोटी मुले फटाके फोडण्यासाठी पालकांकडे हट्ट धरतात.
- फटाके फोडताना मुलाची आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. फटाके फोडताना मोठ्या व्यक्तींनी मुलांसोबत उपस्थित राहावे.
- खुल्या मैदानात फटाके फोडताना सुती कपडे घालावेत. पायात चप्पल किंवा बूट असायला हवेत. ज्वलनशील वस्तू आणि फटाके मुलांपासून दूर ठेवावेत.
- फटाके पेटवण्यासाठी आगकाडी किंवा लायटरऐवजी अगरबत्ती किंवा फुलबाजाचा वापर करावा. सुरक्षिततेसाठी पाण्याची बादली जवळ ठेवावी.
- इमारतीच्या आत किंवा जिन्यावर कधीही फटाके फोडू नयेत. फोडण्यासाठी हिरवे फटाके वापरण्याचा विचार करावा, जे पर्यावरणासाठी कमी हानिकारक आहेत.