कलिंगडामुळे आरोग्याला होणारे फायदे वाचाल तर थक्क व्हाल

9744

उन्हाळा येऊन दाखल झाला असून उन्हाच्या प्रचंड झळांनी सगळ्यांना अगदी हैराण केले आहे. या वाढत्या तापमानात आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. दुपारचे कडक ऊन आणि हवेतील उष्णता यांमुळे शरीराच्या वेगवेगळ्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी तसेच आरोग्य सांभाळण्यासाठी आहारात थंड गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे असते.

watermelon0

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात निसर्गतः पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा. तसेच पाणी जास्त प्यावे असा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. तसेच फळांचाही प्रामुख्याने समावेश करावा असेही ते सांगत असतात. उन्हाळाच्या ऋतूमधील खूप महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वे आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते.

कलिंगडामुळे आरोग्याला होणारे फायदे –

  • कलिंगडामध्ये निसर्गतःच पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील पाण्याचे योग्य प्रामाण राखण्यास मदत करते.
  • उन्हापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी हे फळ खूप मदत करते.
  • कलिंगडामुळे तुमची किडनी सुरक्षित राहण्यासाठी मदत होते.

watermelon-2

  • कलिंगडाच्या बियाही उपयोगी असतात. या बियांची पावडर करून ते चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होते. तसेच याचा लेप डोकेदुखीवर चांगला उपाय आहे.
  • कलिंगडामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्मही मोठ्या प्रमाणात असतात.
  • हृदयासंबंधी समस्या रोखण्यासाठी कलिंगड हे रामबाण उपाय आहे. कलिंगड कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होऊ शकते.
आपली प्रतिक्रिया द्या