
मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्त्वावर 6 हजार 555 बसेस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार करण्यात आला आहे. त्यापैकी 2 हजार 167 बसेस बेस्ट उपक्रमाच्या सेवेत दाखल झाल्या असून उर्वरित बसेससाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या 4 ते 5 वर्षांत बेस्टच्या ताफ्यात किमान 10 हजार बसेसची भर घालण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. याबाबत राजेश राठोड, सतेज पाटील, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न विचारला आहे.