
बेस्ट उपक्रमामध्ये कायमस्वरूपी महाव्यवस्थापकाची नेमणूक करा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने मंगळवारी राज्य सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आले आहे.
बेस्टची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी बेस्ट उपक्रम प्रत्येक महिन्याला कर्ज काढत आहे. बेस्ट बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे कोणताही आयएएस अधिकारी बेस्ट उपक्रमावर येण्यास इच्छुक नाही. बेस्टला नवजीवन देण्यासाठी कायमस्वरूपी महाव्यवस्थापकाची नेमणूक करणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे आणि बेस्टमध्ये कायमस्वरूपी महाव्यवस्थापकाची नेमणूक करावी, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.