महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टची विशेष बससेवा

‘महालक्ष्मी यात्रे’साठी बेस्ट उपक्रमाने विशेष बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या यात्रेसाठी ही सेवा उपलब्ध केली आहे. यात्रेच्या काळात गर्दीचा मोठा अंदाज लक्षात घेऊन बेस्टकडून 25 अतिरिक्त बसमार्गांवर फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या विशेष बससेवांमुळे भाविकांना शहरातील विविध भागांतून तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, मुंबई सेंट्रल, दादर आदी महत्वाच्या रेल्वे स्थानकांहून थेट महालक्ष्मी मंदिरात पोहोचणे सुलभ होणार आहे. याशिवाय लालबाग, प्रभादेवी, वडाळा, सातरस्ता यांसारख्या गर्दीच्या ठिकाणीही बससेवा उपलब्ध राहील.