
ऑनलाईन गेमिंगच्या नादात भंडारा येथील तुमसर येथील कॅनरा बँकेतील सहायक मॅनेजरने बँकेतील रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपिला अटक केली आहे.
भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला मॉइल्सच्या कॅनरा बँकेत मंगळवारी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र आता या चोराचा तपास लागला असून चौरी बॅंकेतील मॅनेजरनेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम त्याने लुटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चिखला मॉईल्स येथील कॅनरा बॅंकेचे सहाय्यक मॅनेजर मयूर नेपाले (32) याला अटक केली आहे.
मयूर नेपाले हा कॅनरा बॅंकेत सहाय्यक बॅंक मॅनेजर होता. त्याला ऑनलाइन गेमिंग, शेअर मार्केट ट्रेडिंगचं व्यसन लागलं होतं, त्यात तो कर्जबाजारीही झाला होता. यासोबत अन्य असं लाखो रुपयांचं कर्ज असल्यानं ते परतफेड करण्यासाठी सहाय्यक मॅनेजरनेच बँक लुटली. या बँके मॅनेजरकडून पोलिसांनी 96 लाखांची रोकड जप्त केली आहे. यासह या चोरीच्या रकमेसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनासह मोबाईल व अन्य असा 1 कोटी 7 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.






























































