नारायण राणे यांनी मर्डर केले म्हणून मोठे झाले, सिंधुदुर्गात मिंधे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भरत गोगावलेंचे वादग्रस्त वक्तव्य

मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्याबद्दल धक्कादायक विधान केले आहे. नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलला गेले, मरामारी केली, मर्डर… हे सगळं झालं, असे वक्तव्य गोगावले यांनी केले आहे. सिंधुदुर्गात मिंधे गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात गोगावले यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून भाजप आणि मिंधे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

राजकोट किल्ला बंद ठेवण्याची शासनावर नामुष्की, माजी आमदार वैभव नाईक यांची टीका

नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर… सगळं झालेलं आहे. हे वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाहीये. भानगडी करा असं सांगत नाही आम्ही, जुळवून घ्यायचं. पण त्यांच्याही काही मंडळींनी थोडं आम्हाला पण जुळवून घ्यायला पाहिजे. हा आमचा सल्ला आहे, असे म्हणत गोगावले यांनी राणेंना टोला लगावला आहे. भरत गोगावले यांच्या या वक्तव्याने महायुतीत वादाचे फटाके फुटण्याची चिन्हे आहेत.

राजकोट किल्ला बंद, तरीही शिवपुतळा दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी