
मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ आज सकाळी भलामोठा कंटेनर पलटी झाला. भिवंडी तालुक्यातील कुकसे गावच्या हद्दीत नाशिकच्या लेनवर ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त टँकरने मुंबई-नाशिक महामार्ग अडवला. यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली. तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कुकसे गावच्या हद्दीतील भोईरपाडा येथील गोदाम संकुलात साहित्य घेऊन कंटेनर निघाला होता. चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यात पलटी झाला. या अपघातामुळे कुकसे ते येवई या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या अपघातात कंटेनरचालक किरकोळ जखमी झाला.



























































