बिग बॉसच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरु आहे. यामध्ये कॅप्टन्सीसाठीचे उमेद्वार निश्चीत होणार आहेत. यादरम्यान घरात पुन्हा एकदा राडे पाहायला मिळणार असून बिग बॉसच्या घरातील दुसरा कॅप्टन कोण असेल हे देखील ठरणार आहे. आता बिग बॉस मराठीने आजच्या भागाचा नवा प्रोमो शेअर केला आहे.
बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात प्रेक्षकांना जान्हवीमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये खटके उडताना दिसणार आहेत. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
प्रोमोमध्ये निक्की अरबाजला हात जोडून विनंती करताना दिसत आहे. “अरबाज तू सगळ्या घराकडे जा…माझ्याकडे येऊ नको”. असं निक्कीने अकबाजला ठणकावून सांगितले. यावर उत्तर देताना अरबाज म्हणाला “तुझ्यासोबत जसं मी वागतो तसचं आता मी त्याच्यासोबत वागणार”. त्यानंतर निक्की घन:श्याम आणि वैभवला म्हणते,”अरबाज ‘त्या’ मुलीकडे कसा जाऊ शकतो? ज्या मुलीच्या विरोधात मी गेले होते. त्याला ट्रॉफी द्या नाहीतर वेड लागेल त्याला”.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता वादाचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे सगळे सदस्य आता आपल्या मुद्द्यासाठी भांडत आहेत. सदस्यांचे खरे रंग आता प्रेक्षकांना दिसायला लागले आहेत.