
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस हिंदीचा 19 वा सिझन संपत असतानाच बिग बॉस मराठीची घोषणा झाली. तेव्हापासून बिग बॉस मराठी कधी सुरू होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
शुक्रवारी रात्री बिग बॉस मराठीचा दुसरा प्रोमो कलर्स मराठीने प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये चॅनेलने सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा भाऊ रितेश देशमुखची झलक दाखवली आहे. हा प्रोमो जरी समोर आला असला तरी बिग बॉस मराठीची तारिख अद्याप चॅनेलने जाहीर केली नसल्याने चाहते नाराज झाले आहेत.
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन खूप हिट झाला होता. हा सिझन युट्युब स्टार सुरज चव्हाण याने जिंकला होता. या सिझनमध्ये पहिल्यांदाच रितेश देशमुखने बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर आता सहावा सिझन देखील रितेशच होस्ट करणार आहे.

























































