Pahalgam Terror Attack – दहा वर्षांतील मोठे दहशतवादी हल्ले

terrorist

16 सप्टेंबर 2015 ः जम्मू-श्रीनगर महामार्गावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यात 2 जवान शहीद तर 11 जवान जखमी झाले होते. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले.

18 सप्टेंबर 2016 ः जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी उरी येथील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला केला. यात 19 जवान शहीद झाले, तर 30 हून अधिक जखमी झाले.

14 फेब्रुवारी 2019 ः पुलवामात जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने सीआरपीएफच्या ताफ्यावर स्पह्टकांनी भरलेल्या वाहनाद्वारे हल्ला केला. यात तब्बल 40 जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने बालाकोटमध्ये हवाई हल्ले केले.

9 जून 2024 ः रियासीमध्ये शिवखोरी मंदिरातून परतणाऱया यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे बस खड्डय़ात पडली. यात 9 जणांचा मृत्यू तर 33 भाविक जखमी झाले.

8 जुलै 2024 ः कठुआमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात 5 जवान शहीद, तर 5 जखमी झाले होते.

16 जुलै 2024 ः डोडाच्या देसा जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात 4 जवान आणि 1 पोलीस शहीद झाला.

20 ऑक्टोबर 2024 ः दहशतवाद्यांनी गंदेरबलमधील एका बांधकामाच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला.

24 ऑक्टोबर 2024 ः बारामुल्ला येथील गुलमर्गजवळ लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यात 2 जवान आणि 2 नागरिक (पोर्टर) ठार झाले.