
स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांचे निधन झाले आहे. रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांच्यावर रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. या घटनेला रिम्स रुग्णालयानेही दुजोरा दिला आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हृदयाच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. मंगल मुंडा (45) वर्षांचे होते. त्यांनी राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) मध्ये रात्री साडेबारावाजता अखेरचा श्वास घेतला. झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात मंगल मुंडा गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
रिम्सचे डॉ. हिरेन बिरुआ म्हणावे की, बिरसा मुंडा यांचे नातेवाईक मंगल मुंडा यांचा रात्री 12 वाजता हृदयाच्या झटक्याने मृत्यू झाला. गंभीर जखमी झाल्याने मंगल मुंडा व्हेंटिलेटरवर होते. आम्ही त्यांना पूर्णपणे वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र अयशस्वी झाला. अपघातात मंगल मुंडा यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती आणि मेंदूच्या दोन्ही बाजूने रक्त साकळले होते. मंगळवारी रिम्सच्या न्यूरोसर्जरी विभागाच्या विभागाध्यक्ष डॉ. आनंद प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी रात्री त्यांना हृदयाचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.