
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-2 येथे शिवसेनाप्रमुखांचा जन्मशताब्दी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी विमानतळावरील कामगार, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सांताक्रुझ विधानसभा संघटक सदा परब, समीर साबे, नगरसेविका श्रवरी परब, लोना रावत, मानसी जुवाटकर, स्थानिक शाखाप्रमुख, मियाल व्यवस्थापन व इतर विविध कंपन्यांचे अधिकारी, सदस्य यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचाराने भारावून गेलेल्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीतील गार्डन विभागाचे कर्मचारी प्रदीप जाधव यांनी स्वतः लिहिलेले गीत सादर केले. नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, राजा ठाणगे, सूर्यकांत पाटील, सहचिटणीस नीलेश ठाणगे, विजय तावडे, विजय शिर्पे, संजीव राऊत, सुजित कारेकर, संदेश कांबळे, संदीप काळे आदी उपस्थित होते.






























































