
राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाला 100 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता अमरावतीत भाजपने थेट एमआयएमशी हात मिळवणी केली आहे. इतकंच नाही तर अजित पवार गटानेही या युतीत आपला सहभाग नोंदवला आहे.
एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमने युती केली आहे. भाजपकडून एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या युतीत एमआयएमचे 3 नगरसेवक, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत सहभागी झाला आहे.




























































