भाजपचे जागांचे गणित फसले

गेल्या निवडणुकांतील 303 जागांपेक्षा किती तरी कमी म्हणजे फक्त 240 जागांवर भाजपने यंदा विजय मिळवला असला तरी त्यांच्या मतांच्या टक्केवारीत केवळ किरकोळ घट झाली आहे. याचा अर्थ यावेळी ते त्यांच्या मतांचा टक्का जागांमध्ये रूपांतरित करू शकलेले नाहीत.

2019 मध्ये भाजपने एकूण मतांपैकी सुमारे 37.36 टक्के मते मिळविली होती. यावेळचा कल पाहता भाजपला एकूण मतदानातील 36.59 टक्के वाटा मिळू शकतो. म्हणजेच गेल्या वेळच्या वाटय़ात जेमतेम 0.77 टक्के घट या वेळी दिसून येते.