मला कॉपी करू दे, अन्यथा हातपाय तोडून टाकीन; भाजपच्या माजी खासदाराने मित्राला दिली होती धमकी

उत्तर प्रदेशातील कैसरंगज येथील भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंग यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. मी सलग तीन वर्षे आठवीत नापास झालो आहे. मी फक्त क्रीडा विषयात उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी कसा तरी कॉपी करून उत्तीर्ण झालो. त्यावेळी शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्याला मा कॉपी करू दे, अन्यथा हातपाय तोडून टाकीन, अशी धमकी आपण दिली होती, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी विद्यार्थ्यांसमोरच स्वतःच्या धमकीचे कौतुक केल्याने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभात सहभागी झाले होते. येथील व्यासपीठावरून त्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. मात्र, आपण कोणासमोर काय बोलत आहोत, विद्यार्थ्यांसमोर आपण काय आदर्श ठेवत आहोत, याचा त्यांनी विसर पडला. आपण कॉपी करून पास झालो, कॉपी करण्यासाठी आपण मित्राला धकी दिली होती, असेही शेखीही त्यांनी मिरवली.

ते म्हणाले- मी आठवीच्या वर्गात तीन वेळा नापास झालो. पुन्हा नापास होऊ नये म्हणून मी माझ्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला धमकावले आणि त्याला माझी उत्तरप्रत्रिका लिहिण्यास सांगितले. सर्व विषयांमध्ये आपण खूप चांगल्याप्रकारे कॉपी केली. मात्र, इंग्रजीचा पेपरला कॉपी करणेही जमत नव्हते. कारण इंग्रजी लिहिण्याची सवयच नव्हती. त्यामुळे माझ्या शेजारी एक तिवारी नावाचा मुलगा बसला होता, तो इंग्रजी चांगले लिहित होता. मी तिवारीला धमकावत आधी माझी उत्तरपत्रिका लिहिण्यास सांगितले. तो म्हणाला, मी माझी उत्तरपत्रिका लिहू की तुझी? जर तू माझी उत्तरपत्रिका लिहिली नाहीस तर तू बाहेर येताच तुझे हातपाय तोडून टाकीन, अशी धमकी त्याला दिली. त्यामुळे भीतीने त्याने माझी उत्तरपत्रिका लिहून दिली आणि मी पास झालो, असेही सिंह यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोरच हे सर्व सांगितल्याने संतापाची लाट उसळली आहे.