भाजपकडून गुलाम मीर यांना राज्यसभेचे तिकीट

जम्मू-कश्मीरमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या चार जागांपैकी तीन जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. कश्मीरमधून गुलाम मोहम्मद मीर यांना, तर जम्मूतून सत्पाल शर्मा आणि राकेश महाजन यांना तिकीट देण्यात आले आहे.

येत्या 24 ऑक्टोबरला चार जागांसाठी ही निवडणूक होत आहे. चौथ्या जागेसाठी चुरशीची लढत होणार आहे. या जागेसाठी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आघाडीकडे 24 मते आहेत, तर भाजपकडे 28 मते आहेत. नॅशनल कॉन्फरन्सने ही जागा काँग्रेसला दिली आहे, मात्र निवडून येण्याची हमी नसल्याने काँग्रेसने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर ही आहे.

कोण आहेत गुलाम मीर?

गुलाम मीर हे कश्मीर खोऱ्यातील राजकीय व सामाजिक जीवनातील प्रमुख नाव आहे. मीर हे शिक्षण क्षेत्राशीही संबंधित असून कश्मीर खोऱ्यातील विकास प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील मुस्लिम समुदायावर प्रभाव टाकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.