
बिनविरोध नगरसेवक निवडून यावे, यासाठी भाजपकडून आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे की, कोटय़वधी रुपये खर्च करून उमेदवारांना कसे विकत घेता येते. हा सर्व प्रकार लोकशाहीला घातक आहे, असे जलील म्हणाले. लोकसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांनी स्वतः हेलिकॉप्टरमधून मोठया पैशांच्या बॅगा छत्रपती संभाजीनगरात उतरवल्या होत्या, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.





























































