
अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी भागात एका जुन्या वाडय़ात चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्डय़ावर पोलिसांनी मध्यरात्री सर्जिकल स्ट्राईक करत 21 जणांच्या मुसक्या आवळल्या. हा जुगार अड्डा एका भाजप पदाधिकाऱ्याचा असल्याचे समोर आले आहे.
सुपे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. ढोणे गल्लीतील एका जुन्या वाडय़ात जिह्याबाहेरून येणाऱ्या जुगारींचा राबता असल्याची माहिती गडकरींना मिळाली होती. पथकाने मध्यरात्री अड्डय़ाला घेराव घालत छापा टाकला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 21 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
रामचंद्र राऊत, गणेश प्रल्हाद चोभे, यशवंत पंढरीनाथ ढोणे, प्रेमशंकर गणेशलाल कश्यप, मोहन दत्तू गोरे (रा. बागडपट्टी, अहिल्यानगर), अमर रूपा छाडेकर (रा. पारधी, ता. जामनेर, जि. जळगाव), राहुल प्रकाट भट (रा. तेलीखुंट, अहिल्यानगर), हेमंत गणेश गायकवाड, जिजाबा रखमाजी भोसले (रा. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापूर), समाधान श्रीमंत सुरवसे (रा. नवगण, राजुरी, जि. बीड), अशोक विश्वनाथ चोभे (रा. केडगाव, अहिल्यानगर), विशाल रोहिदास नाकाडे (रा. कोठी, अहिल्यानगर), सतीश परशुराम जेजुरकर (रा. केडगाव, अहिल्यानगर), अशोक बबन घोगरे (रा. नवगण, बीड), तुषार अशोक लड्डा (रा. अडतेबाजार, अहिल्यानगर), सूरज अशोक यादव (रा. भिसेगाव, ता. कर्जत, जि. रायगड), श्रीमंत निवृत्ती सुरवसे (रा. नवगण बीड), जिशानखान मंजुरखान पठाण (रा. बेलदार गल्ली, अहिल्यानगर), अमोल महादेव कांबळे, राजू रामदास जगताप (दोघेही रा. राशीन, ता. कर्जत), रिंटू नंदेलाल महातो (रा. विहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बीडपर्यंतचे कनेक्शन उघड
हा जुगार अड्डा केवळ स्थानिक नव्हता, तर त्याचे धागेदोरे थेट बीड जिह्यापर्यंत पसरले होते. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये अहिल्यानगर शहर, जिह्यातील विविध तालुके आणि बीडमधील सराईत जुगारींचा समावेश आहे. अड्डय़ावरून 4 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्या वाडय़ात हा ‘जुगाराचा बाजार’ भरत होता. तो वाडा भाजपच्या एका बडय़ा पदाधिकाऱ्याचा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या कारवाईने शहरातील गुन्हेगारांचे आणि त्यांच्या राजकीय पाठीराख्यांचे धाबे दणाणले आहेत.

























































