मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा भाजप, आरएसएसकडून अपमान; शिवसेनेच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन

राज्यात सध्या कोणीही उठतो आणि महाराष्ट्रातील महापुरुष आणि मराठी भाषेविषयी अपमानास्पद वक्तव्य करतो. असा अपमान होत असतानाही भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार गप्प का आहे? मुंबई महाराष्ट्रात राहावी, यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक करीत आहेत, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभारी शहरप्रमुख संजोग वाघेरे-पाटील यांनी केला आहे.

घाटकोपर येथे एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवारी (7 रोजी) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शहरप्रमुख संजोग वाघेरे-पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, शहर संघटिका अनिता तुतारे, युवासेना अधिकारी चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, हाजी मणियार, उपशहरप्रमुख हरेश नखाते, पिंपरी विधानसभाप्रमुख तुषार नवले, माजी नगरसेविका मीनल यादव, विशाल नाचपल्ले, यांच्यासह युवासेना, महिला आघाडी, शिवदूत, शिवसेना संलग्न विविध संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. हा त्या हुतात्म्यांचा अपमान आहे.’ माजी आमदार अॅड. चाबूकस्वार म्हणाले, ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा भाजप-आरएसएसचा कुटिल डाव आहे. तो आम्ही हाणून पाडू