
आचारसंहिता धाब्यावर बसवत भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावला. रवींद्र चव्हाण लुंगी लावून शर्टवर ठसठशीत कमळाचे चिन्ह लावून मतदान केंद्रात आले. मतदानाचे फोटो स्वतŠ रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्यानंतर हा विषय अधिकच चिघळला. डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला. मतदानासाठी रांगेत उभे राहताना तसेच मतदान कक्षात प्रवेश करताना त्यांच्या छातीवर स्पष्टपणे कमळाचे चिन्ह दिसत होते. त्याच चिन्हासह त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. आचारसंहिता भंग करणाऱयांना ठोकून काढू, असा इशारा देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कुणाला ठोकून काढणार, असा संतप्त सवाल डोंबिवलीकरांनी केला.
































































