दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळाला

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एआय 171 हे विमान नेमके कशामुळे दुर्घटनाग्रस्त झाले, वैमानिकाची चूक होती की तांत्रिक बिघाड, शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये नेमके काय घडले? या प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. कारण दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स डेटा मिळाला आहे.

ब्लॅक बॉक्समधील डेटा यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आला असून मेमरी मॉडय़ूलचा अॅक्सेसदेखील मिळवण्यात आला आहे.