जिद्दीच्या जोरावर नेत्रहीन नम्रताने मिळवले संगणकाचे ज्ञान

जन्मतःच अंध असूनही शिकण्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अहिल्या नगरच्या नम्रता गुरव हिने स्क्रीन रिडर सॉफ्टवेअरच्या मदतीने एमएस-सीआयटीचा कोर्स पूर्ण केला. अंध असूनही नम्रताने लेखनिकाच्या मदतीने यंदा दहावीत 70 टक्के गुण मिळवले. त्यानंतर सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिने संगणक प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. त्यानुसार तिने प्रशिक्षण घेतले. पुढे एमएस-सीआयटी कोर्स करण्याचे ठरवले. स्क्रीन रिडर सॉफ्टवेअरच्या मदतीने नम्रता संगणकाचे ज्ञान आत्मसात करत आहे. तिच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.