
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार वाॅर्ड क्रमांक २०६ मधून, शिवसेनेचे सचिन पडवळ यांना १२ हजार १८९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी मिंधे गटाच्या नाना आंबोले यांचा दारूण पराभव केला आहे. सचिन पडवळ यांनी या विजयाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांना दिले आहे. तसेच हा उद्धव, राज, आदित्य, अमित ठाकरें असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
लालबाग, परळ, नायगाव, शिवडी ठाकरेंचीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या बालेकिल्ल्यात आवाज निष्ठावंतांचाच असणार, इथे गद्दारांना थारा नाही असे ते म्हणाले. आदित्य तसेच राज ठाकरे यांचे शिवतीर्थावरील भाषण, उद्धव साहेबांचा योग्य मार्गदर्शन यामुळेच हा विजय मिळाला असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तसेच ठाकरेंच्या शाखा भेटीमुळे शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे.
ठाकरे संपले म्हणणाऱ्यांना मराठी जनतेचे सणसणीत चपराक दिली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच लालबाग परळ आणि गिरगाव फक्त ठाकरेंचेच आहे. बंडखोरांना जनतेने जाग दाखवून दिली आहे. माझा हा विजय माझ्या कामावरील ठाकरेंनी दाखवलेला विश्वास आहे. करोना काळात केलेली कामे जनता विसरलेली नाही.





























































